‘भारताविरुद्ध जाण्याची हिंमत कोणामध्येचं नाही’

imaran khan

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नेमहीच आपल्या वक्त्यव्याबद्दल चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी BCCI बदल एक मोठे विधान केले आहे. यावेळी त्यांनी कबूली दिली आहे की, भारत संपूर्ण जगाचे क्रिकेट नियंत्रित करतो.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, ‘भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) जगातील सर्वात श्रीमंत मंडळ आहे. तो जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवतो. इंग्लंडने नुकताच आमचा दौरा रद्द केला होता, पण भारताविरुद्ध असे करण्याचे धाडस कोणाकडेही नाही. अलीकडेच, पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांनीही बीसीसीआयने आयसीसीला निधी न दिल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होईल असे म्हटले होते.

मिडल ईस्ट आयशी बोलताना इम्रान खान म्हणाले, ‘यावेळी पैसा सर्वात महत्वाचा आहे. भारत सर्वात श्रीमंत मंडळ आहे. अशा परिस्थितीत कोणताही देश त्याच्याविरोधात ते पाऊल उचलण्याचे धाडस करणार नाही, जे इंग्लंडने पाकिस्तानसोबत केले. ‘ते म्हणाले की केवळ खेळाडूच नव्हे तर विविध देशांच्या मंडळांनाही भारताकडून पैसे मिळतात. यामुळे तो क्रिकेटवर पूर्णपणे नियंत्रण ठेवत आहे.

इम्रान खान म्हणाले, ‘मला वाटते की इंग्लंडला अजूनही वाटते की पाकिस्तानसारख्या देशांविरुद्ध खेळून ते त्यांच्यासाठी अनुकूल आहे. याचे एकमेव कारण पैसे आहे. त्यांनी सांगितले की, मी पाकिस्तान आणि इंग्लंडमधील क्रिकेट संबंध वाढताना पाहिले आहे. टी -20 विश्वचषकापूर्वी इंग्लिश पुरुष संघाला पाकिस्तानमध्ये 2 टी-20 विश्वचषक सामने खेळायचे होते. याशिवाय इंग्लंड महिला संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार होता. पण सुरक्षेच्या कारणामुळे ईसीबीने हा दौरा रद्द केला.

इंग्लंडनंतर न्यूझीलंड दौराही रद्द 

इंग्लंड दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानला पोहोचला होता. संघाने सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी दौरा रद्द केला. यामुळे टी -20 विश्वचषकाच्या पाकिस्तानच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच, रमीम राजा म्हणाले होते की आयसीसीला त्यांच्या उत्पन्नाचा 90 टक्के हिस्सा भारताकडून मिळतो.

महत्त्वाच्या बातम्या