fbpx

बंदमध्ये सहभागी होऊ नये म्हणून कोणीही फोन केला नाही ; संजय राऊत यांचा खुलासा

sanjay raut 2

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’मध्येशिवसेनेनं सहभागी होऊ नये, यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. ‘मुंबई मिरर’ने यासंबंधी वृत्त दिले आहे. मात्र अमित शहा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भारत बंदसंदर्भात कोणताहीफोन आला नसल्याचे सांगत शिवसेनेकडून हे वृत्त फेटाळून लावण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणाचाही फोन आला नव्हता. उद्धव ठाकरेंनी विचारपूर्वक भारत बंदला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.