fbpx

‘पवार घराण्यातील कोणीही लोकसभेत जाणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा – शरद पवार राज्यसभेवर असल्याने वाचले, परंतु त्यांच्या घराण्यातील कोणीही आता लोकसभेत जाणार नाही, असे भाकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे. ते महायुतीच्या उमेदवार कांचन कूल यांच्या प्रचारार्थ बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी जाहीर सभेत ते बोलत होते.

मतदारांशी मी बोललो तर पवारांवर सूड उगवण्याची नामी संधी उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणत आहेत, असेही ते म्हणाले. पार्थ हरल्यावर अजित पवार घरी तरी जाऊ शकतील का, असा सवाल त्यांनी केला. पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्यापासून ते त्यांच्या विश्वासघाताची अनेक उदाहरणे देता येतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, याच सभेत मुख्यमंत्र्यांनी देखील पवारांवर हल्लाबोल केला. ही लढाई ‘सातबारा’मतीकर विरुद्ध चौकीदार अशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.