ऑक्सिजन अभावी नाशिक येथे एकही रुग्णाचा मृत्यू नाही

मुंबई, दि. ७: सामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेतील साधने आणि उपकरणांच्या तपासणी कामी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्यास त्यांचे निलंबन केले जाईल. ऑक्सिजन अभावी नाशिक जिल्ह्यात रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना नाही, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता त्याला उत्तर देताना श्री. बापट यांनी सांगितले की, रुग्णालयांना पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन या अत्यावश्यक सेवेसाठी दरवर्षी तपासणी केली जाते. नाशिक शहराला रायगड जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा होतो. स्थानिकस्तरावर ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी रुग्णालयांबरोबर बैठक घेऊ, असेही श्री. बापट यांनी सांगितले.

सदस्य दीपिका चव्हाण, जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.