वाघाला कोणी गोंजारू शकत नाही- शिवसेना

२०१४ च्या निकालामुळे कोणाला वाटत असेल ते सिंह झालेत, वाघ झालेत, पण मांजरीचा वाघ होत नसतो.

नवी दिल्ली: शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना-भाजप एकत्र लढणार.’ असं वक्तव्य करणारे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेने ठणकावले.

उत्तर प्रदेश आणि बिहारचे निकाल विरोधात गेल्यामुळे शिवसेनेला गोंजरण्याचे काम सुरु आहे का? त्यावर बोलतांना  वाघाला कोणी गोंजारू शकत नाहीत. तसेच २०१४ च्या निकालामुळे कोणाला वाटत असेल ते सिंह झालेत, वाघ झालेत, पण मांजरीचा वाघ होत नसतो. शिवसेनेचा वाघ बाळासाहेबांनी स्वीकारलेला पिवळ्या पट्ट्यावाला वाघ आहे.

शिवसेना सत्तेसाठी, मांडवली करण्यासाठी युतीमध्ये जात नाही ज्यांना मैत्रीचे पावित्र्य समजत नाही त्यांनी युवती संदर्भात शिवसेनेशी बोलू नये. अशे शिवसेनेने ठणकावून सांगितले.

You might also like
Comments
Loading...