fbpx

गंभीरला निवडणूक लढवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही !

नवी दिल्ली : दिल्लीतील पूर्व दिल्ली लोकसभा मतदारासंघाची लढाई आता मतदारसंघाबाहेर कोर्टातही सुरू आहे. आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी यांनी भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटपटून गौतम गंभीरवर दोन व्होटर आयडी असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी थेट कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावर भाष्य केले असून, जो उमेदवार लवकरच बाद ठरणार आहे, त्याला मतदान करून जनतेने आपले मत वाया घालवू नये. लोकप्रिनिधी कायद्याच्या विविध अंगांनी विचार करून या संदर्भात तक्रार दाखल केल्याचे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी या सगळ्या प्रकरणात आम आदमी पक्षावर टीका केली आहे. आम आदमी पक्ष निवडणुकीत पराभूत झाला आहे. त्यामुळेच त्यांनी असे आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. गंभीरकडील सर्व कागदपत्रे योग्य आहेत आणि त्यांना निवडणूक लढवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. आम्ही सकारात्मक राजकारण करणारे आहोत. नकारात्मक राजकारण आम्हाला जमत नाही, असा टोलाही तिवारी यांना लगावला आहे.