जगात शिवसेनेएवढे ‘नीच’ राजकारण कोणीच करू शकत नाही

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ या वृत्तपत्रात आजच्या दि.१५ अंकात आर आर पी सी एल या रत्नागिरीतील पेट्रोलियम रिफायनरीची जाहिरात आली आहे.या जाहिरातीत रिफायनरी पासून होणारे फायदे सांगितले आहेत.त्यामुळे कधी काळी नाणार प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना आज सत्तेत आल्यावर चक्क रिफायनरीचे फायदे मोजायला लागली आहे.

या विषयावर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे,राणे यांनी ट्वीट च्या माध्यमातून शिवसेनेला चांगलेच फैलावर घेतले आहे.

Loading...

राणे म्हणाले की ” पैशासाठी हे लोकं विकले जातात हे आम्ही वारंवार सांगतो. नाणार रिफायनरीला तीव्र विरोध केला, तरुण व माता-भगिनीनी आंदोलन करत केसेस अंगावर घेतल्या पण नेहमीप्रमाणे यु टर्न घेत ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं त्यांच्याशीच परत गद्दारी केली. जगात एवढं नीच राजकारण कोणी करू शकत नाही.

आता समान या वृत्तपत्रात आलेली ही जाहिरात कोणाच्या संमतीने आली आहे हे शिवसेनेकडून सांगण्यात आलेले नसून या जाहिरातीला उद्धव ठाकरे यांचा पाठींबा होता का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Shocking : इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार…? | Shocking News With Indurikar Maharaj | Maharashtra |
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं