पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळावा आणि त्यानंतर झालेली उत्तर सभा यात राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्ला केला होता. शरद पवारांमुळे महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करण्यात आले, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावर स्वतः शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांनीही प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे.
“आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नरेटिव्ह सेट केला जात असून राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपची आहे. राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करत आहेत. मात्र अंगावर शॉल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब होत नाही. राज ठाकरे चांगले अभिनेते आहेत, ते चांगला अभिनय करतात.”, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की, मला राज ठाकरेंचं भाषण आवडायचं. मात्र, आता ते भाजप जे सांगतं ते करत आहेत. सध्या विकासाच्या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही. मात्र, आपण विकासाचे मुद्दे लोकांसमोर घेऊन जाणार. असे रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच जातीपातीच्या टीकेवर ते म्हणाले की, देशात हजारो वर्षापासून जात आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जातीबद्दल अभिमान होता. पण 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माथी भडकावली गेली.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : सनरायझर्स हैदराबाद कडून विजयाची हॅट्ट्रिक! KKRचा ७ विकेट्सने पराभव
- IPL 2022 : राणा – रसेलच्या खेळीने कोलकाता सुसाट! सनरायझर्सपुढे १७६ धावांचे लक्ष्य
- IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का; दीपक चहर स्पर्धेतून बाहेर!
- गुणरत्न सदावर्ते यांना तिहेरी झटका! मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरातही गुन्हा दाखल
- IPL 2022 : नाणेफेक जिंकत हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय; कोलकात्यात फिंचचे आगमन!