विलास पाटील यांना आपण कोणतीही ऑफर दिली नाही : संजय शिंदे

विकास कामांमुळेच विरोधक आपल्या गटात : संजय शिंदे

करमाळा – करमाळा तालुक्यात सध्या आपल्या प्रयत्नातून सुरू असलेल्या विकासकामांमुळेच विरोधी गटातील कार्यकर्ते आपल्या गटात प्रवेश करीत असून आपण कधीही फोडाफोडीचे राजकारण करीत नसल्याची प्रतिक्रिया सोलापूर जि. प. चे अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली.

शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांचे चुलत बंधू आणि करमाळा पंचायत समितीचे अध्यक्ष विलास पाटील हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्यामुळे आमदार पाटील गटात खळबळ उडालेली आहे. याविषयी जि प अध्यक्ष संजय शिंदे यांच्याशी चर्चा केली असता आपल्या विकासकामांमुळेच विरोधक आपल्याकडे येत असून आपण कधीही फोडाफोडीचे राजकारण केलेले नाही तसेच करमाळा तालुक्याचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी ‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना सांगितले असून आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थिती मध्ये लढविणार असल्याचेही संकेत यावेळी त्यांनी दिले.

सोमवार १३ ऑगस्ट करमाळा तालुक्यातील जेऊर येथे विलास पाटील प्रवेश करणार असून होणार असून याच दिवशी करमाळा तालुक्यातील अनेक गावांतील कार्यकर्ते देखील शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.

आमदार नारायण पाटील यांचे बंधू विलास पाटील हे २००७ साली राष्ट्रवादीकडून करमाळा पंचायत समितीवर निवडून आले होते. विलास पाटील यांना आपण कोणतीही ऑफर दिली नाही. माझ्याकडून सुरु असणाऱ्या विकासकामांमुळे ते माझ्या गटात प्रवेश करत आहेत. विलास पाटील हे स्वतः माझ्याकडे आले माझ्या कामांची त्यांनी स्तुती केली आणि भविष्यात सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

नारायण पाटील आणि विलास पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून बऱ्याच मुद्द्यांवरून मतभेद निर्माण झाले होते.अखेर विलास पाटील यांनी नारायण पाटील गटाला राम राम ठोकण्याचा इरादा बनवला. आमदार पाटील यांच्यासाठी हा अत्यंत मोठा धक्का मानला जात असून विलास पाटील यांच्या प्रवेशामुळे शिंदे गट तालुक्यात बळकट होईल अशी शक्यता आहे. आगामी मार्केट कमिटीच्या निवडणुकीत विलास पाटील यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

करमाळ्याच्या राजकारणात ‘यंगब्रिगेड’ सक्रीय

You might also like
Comments
Loading...