‘सेक्रेड गेम्स’चे कोणतेही नवीन भाग प्रदर्शित होणार नाहीत : दिल्ली उच्च न्यायालय

टीम महाराष्ट्र देशा : अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिज कोणतेही नवीन भाग प्रदर्शित करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या वेब सिरीज मध्ये असणारी काही दृश्ये व संवाद आक्षेपार्ह असून त्यात दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांची बदनामी झाली आहे, असा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने आज हा आदेश दिला आहे.

या वेब सीरिजचे आठ भाग प्रदर्शित झाल्याने त्यावर काहीच करू शकत नाही असं म्हणत कोणतेही नवीन भाग प्रदर्शित करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे या वेब सीरिजमधील आक्षेपार्ह संवादासाठी अभिनेत्यांना जबाबदार ठरवता येणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘सेक्रेड गेम्स’ मालिकेत बदनामी करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारास अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी, नेटफ्लिक्स व सेक्रेड गेम्सचे निर्माते जबाबदार आहेत,’ असं काँग्रेस कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी तक्रारीत म्हटलं होतं. या याचिकेवरील पुढील सुनावणी 19 जुलै रोजी होणार आहे.

“राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला”