‘कोंबडं कितीही झाकलं तरी तांबडं फुटायचं राहत नाही’

blank

टीम महाराष्ट्र देशा – सर्व स्तरातून मोदींचे अपयश झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण कोंबडं कितीही झाकलं तरी तांबडं फुटायचं राहत नाही. अस म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींवर टीका केली. ते लोणीकाळभोर येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होते.

यावेळी पाटील म्हणले, देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी देशाच्या संसदेवर मोर्चा काढला. 1 किमी लांबीवर मोर्चा आला तरीदेखील भाजपचा एकही नेता किंवा खासदार त्यांना भेटायला, त्यांना सहानुभूती द्यायला संसदेबाहेर आला नाही. शेतकऱ्यांविषयी कष्टकऱ्यांविषयी भाजपाला कसलीही आपुलकी नाही हे जनतेस पूर्णपणे लक्षात आले आहे.

भाजपाने कितीही गाजरं दाखवली तरी आपल्या कर्मांची फळं येत्या निवडणुकीत भोगावी लागणार असल्याचेही यावेळी पाटील म्हणले.