‘२०१९’ सत्ता कोणाची येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही- शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणूक २०१९ साठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच जाहीर केलं आहे. याचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस नक्कीच होणार आहे. लोकसभेच्या अधिवेशना दरम्यान पत्रकारांशी सवांद साधतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विश्वास दाखवला आहे.

भाजप हा मित्र पक्षांना कमी लेखत असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सर्वप्रथम शेतकरी संघटनेने सोडली. शिवसेनेनेही आगामी काळात भाजपशी युती करण्यास नकार दिला. तसेच तेलगू देसमही भाजपशी संघर्ष करत आहे. त्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत सत्ता मिळविणे अवघड जाणार असल्याचे चिन्ह आहेत.

शरद पवार म्हणाले, भाजपने लोकसभेत एकहाती सत्ता मिळवण्याच्या नादात अनेक मित्रपक्ष तोडले. शिवसेनेसारखे दुखावलेले अनेक मित्र पुन्हा त्यांच्या जवळ येणार नाहीत. त्यात महाराष्ट्रात भाजप व शिवसेना आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढले, तर सत्ता कोणाची येणार, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

You might also like
Comments
Loading...