जीएसटीला एकाही व्यापाऱ्याचा विरोध नाही ; पंतप्रधानांचा दावा

टीम महाराष्ट्र देशा : देशात एकीकडे जीएसटीचा विरोध करणाऱ्यांच्या संखेत वाढ होत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र अजब दाबा केला आहे. जीएसटीचा विरोध देशातल्या एकाही व्यापारी संघटनेनं केला नाही, सर्वांनी त्याला पाठिंबाच दिला असा अजब दाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिमाचल प्रदेशमधल्या एका प्रचार सभेत केला आहे.

दिल्लीत बसणाऱ्यांनाच सगळं समजतं, यावर आमचा विश्वास नाही. देशातल्या प्रत्येकाला बुद्धी आहे. त्यामुळेच आम्ही जीएसटीमध्ये सूचना येतील तसे बदल करत गेलो, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत .
दरम्यान, राहुल गांधी यांनी जीएसटीवरून मोदी सरकार विरोधात आक्रमकतेने रान उठवलं आहे. तर राहुल गांधी यांना जीएसटीबाबत काहीच माहिती नसल्याची आता मला खात्री झाली आहे, असा प्रतीटोला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लगावला आहे.

सध्या थंडीच्या दिवसात जीएसटी वरून राजकीय वातावरण मात्र प्रचंड तपाल्याच चित्र दिसत आहे.