संकटं कितीही येवोत, महाराष्ट्र कधीही झुकणार नाही – अजित पवार

ajit pawar

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर शरद पवारांनी स्वतंत्र मोट बांधत राष्ट्रवादी काँग्रेसची बीजं पेरली. तिच राष्ट्रवादी काँग्रेस आज राज्यातील सत्तेत महत्त्वाच्या भूमिकेत वावरताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकटं कितीही येवोत, महाराष्ट्र कधीही झुकणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.

‘राज्यावर कोरोनाचे संकट आलं आहे. संकट कितीही येवोत, कधीही येवोत, हा महाराष्ट्र कधीही झुकणार नाही, थकणार नाही आणि या कामी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात पुढे उभा असणार’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे, ‘केंद्रात भाजपचं सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि आखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाही संस्था मोडीत काढण्याचं काम सुरू केलं आहे. पत्रकारांपासून अनेक घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाहीला झुंडशाहीचं स्वरुप देण्याचं काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. अशावेळी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

IMP