तावडेंबाबत भाष्य करण्याची आता इच्छा नाही : खा. संभाजीराजे भोसले

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगलीच्या आपत्ती ग्रस्तांच्या आर्थिक मदतीवरून खा. संभाजीराजे भोसले आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात चांगलाचं वाद निर्माण झाला आहे. विनोद तावडे यांनी आपत्ती ग्रस्तांना ज्या पद्धतीने आर्थिक मदत केली यावरून खा. संभाजीराजे भोसले यांनी विनोद तावडेंवर टीका केली होती. भीक नको असं त्यांनी तावडेंना ट्विटरवरून सुनावलं होतं. त्याला तावडेंनेही निवेदन काढून संभाजी राजेंना उत्तर दिलं होतं. ती भीक नव्हती तर रस्त्यावरच्या सामान्य माणसांनी प्रेमाने दिलेले पैसे होते. त्यामुळे राजेंनी सामान्यांची अवहेलना केली आहे. अशी खंत तावडेंनी व्यक्त केली होती.

यावर खा. संभाजी राजे यांनी उत्तर दिले आहे. मी व्यक्त केलेल्या भावना म्हणजे कोल्हापूर, सांगलीकरांच्या भावना आहेत. विनोद तावडेंना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय. तावडेंबाबत पुढे भाष्य करण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे संभाजीराजे आणि विनोद तावडे यांच्यात आता मनभेद झाल्याचं दिसत आहे.

दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. तर अनेकांनी आतापर्यंत जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत केली आहे.