बुमराह, आम्हाला तुझ्या कोणत्याही भावना दुखवायच्या नव्हत्या! – जयपूर वाहतूक पोलीस

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सोशल मीडियाच्या माध्यमातून जयपूर वाहतूक पोलीसांबद्दल काल नाराजगी व्यक्त केल्यानांतर काही वेळातच जयपूर वाहतूक पोलीसांनी आपण ती जाहिरात का बनवली याच स्पष्टीकरण दिल.

गेले बरेच दिवस सोशल माध्यमांवर जयपूर वाहतूक पोलीसांनी बुमराहवर बनवलेला हा पोस्टर फिरत होता. त्यामुळे नाराज बुमराहने काल ट्विटरच्या माध्यमातून जयपूर वाहतूक पोलीसांवर निशाणा साधत परखड मत व्यक्त केले. तसेच मी माणूस आहे. माणसाकडून अशा चुका होतात. तुमच्या अशा चुकांची मी खिल्ली नाही उडवणार. असही म्हटलं होत.

यावर जयपूर वाहतूक पोलीसांनी थोड्याच वेळात तीन ट्विट करत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.

जयपूर पोलीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ” प्रिय बुमराह, आमचा उद्देश तुझा किंवा लाखो क्रिकेट चाहत्यांच्या भावना दुखविण्याचा नव्हता. लोकांमध्ये वाहतूकीच्या नियमांबद्दल जनजागृती हाच यातून उद्देश होता. तू एक युथ आयकॉन आणि प्रेरणास्रोत आम्हा सर्वांसाठी आहे. ”

 

जयपूर वाहतूक पोलीसांनी हे ट्विट करून एकप्रकारे झाल्या सर्व प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका सुरु असून भारताच्या या वेगवान गोलंदाजाला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.