‘कोणत्याही भारतीयाला या कायद्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, शांतता राखा’ – नेरंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा :  नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरातून त्याला विरोध केला जात आहे. ईशान्य भारतातील आसाम, गुवाहाटी सारख्या ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्यानंतर आता सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला असून देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमागोमाग एक ४ ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये म्हणतात, ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा, २०१ संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जबरदस्त पाठिंबाने मंजूर केल आहे. मोठ्या संख्येने राजकीय पक्ष आणि खासदारांनी त्यास पाठिंबा दर्शविला. हा कायदा भारताची शतकानुशतके स्वीकारलेली, सुसंवाद, करुणा आणि बंधुता या संस्कृतीचे वर्णन करतो.

Loading...

पुढे त्यांनी ट्विट केल आहे, “मला माझ्या सह भारतीयांना स्पष्टपणे सांगायचे आहे, ‘की सीएए कोणत्याही धर्माच्या भारतातील कोणत्याही नागरिकावर परिणाम करीत नाही. या कायद्यासंदर्भात कोणत्याही भारतीयांना काळजी करण्याची काही गरज नाही. हा कायदा फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना बाहेरील अनेक छळ सहन करावा लागला आहे आणि त्यांना भारत सोडून इतर काही स्थान नाही.

“आपण सर्वांनी एकत्रितपणे भारताच्या विकासासाठी आणि प्रत्येक भारतीय, विशेषतः गरीब, वंचित आणि अपंग लोकांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याची काळाची गरज आहे. आम्ही स्वार्थासाठी स्वारस्य असलेल्या गटांना आमचे विभाजन करण्यास आणि त्रास निर्माण करण्यास परवानगी देऊ शकत नाही”. तर शांतता, ऐक्य आणि बंधुता टिकवण्याची हीच वेळ आहे. सर्वांनी माझे आवाहन आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा व इतर खोटेपणापासून दूर रहावे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार