‘२०२२ नंतर सुत्रसंचालन करणार नाही’; आदित्य नारायणने केली घोषणा

आदित्य नारायण

मुंबई : सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल १२’ हा रिअॅलिटी शो लोकप्रिय होत असताना अनेकदा वादात सापडला आहे. या शोमधील सुत्रसंचालक आदित्य नारायणची देखील अनेक कारणांमुळे चर्चा झाली आहे.  यातच आता पुन्हा एकदा त्याने केलेल्या घोषणेमुळे त्याची चर्चा रंगली आहे. नुकतेच एका मुलाखतीत आदित्य २०२२ नंतर सुत्रसंचालन करणार नाही असं त्याने सांगितलं आहे.

आदित्यने मुलाखतीत म्हंटले की, ‘२०२२ हे वर्ष माझं सुत्रसंचालक म्हणून शेवटचं वर्ष असणार आहे. त्यानंतर मी सुत्रसंचालन करणार नाही. आता मला काही वेगळं करायचं आहे. मी आधीच काही लोकांना त्यांच काम करणार असं सांगत होकार दिला होता. ते काम मी येत्या काही महिन्यात पूर्ण करणार आहे. इंडस्ट्रीमध्ये माझे चांगले मित्र आहेत, म्हणून जर मी आता हे सगळं मध्येच सोडलं तर मी जहाज मध्येच सोडलं असं वाटेल,” असे आदित्य म्हणाला.

पुढे आदित्य म्हणाला, ‘पुढच्या वर्षी मी टीव्हीवरून ब्रेक घेईल. एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करायला चांगल वाटतं पण त्यासगळ्या गोष्टी एकत्र केल्यामुळे दमायला होतं. मी १५ वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. या बद्दल मी आभारी आहे. सुत्रसंचालनामुळे मी मुंबईत घर,गाडी घेऊ शकलो. मी सुत्रसंचालन करणार नाही याचा अर्थ मी टीव्हीवर दिसणार नाही असं नाही, तर मी गेम शोमध्ये भाग घेईन किंवा कोणत्या शोचा परिक्षक होईल’, असा मोठा खुलासा त्याने केल्याने त्याचा चाहता वर्ग निराश झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP