कर्णकर्कश हॉर्न वाजणाऱ्या वाहनांवर कारवाई

 पुणे :  कर्णकर्कश आवाजाचा हॉर्न बसविला असेल… मोठ्या आवाजाचा सायलेंसर असेल… तर वाहन चालकांनो सावधान ! आता अशा वाहनांवर कारवाई होणार आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी परिवहन विभागाने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना अशा हॉर्न, सायलेंसरचा आवाज मोजण्यासाठी “डेसिबल मीटर‘ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हे मीटर दाखल झाल्यानंतर अशा वाहनांवर लवकरच कारवाईस सुरवात होणार आहे.
पाच वर्षे कैद वा लाख रुपये दंड
पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार शांतता झोन असलेल्या परिसरात 50 डेसिबल, निवासी झोन परिसरात 55 डेसिबल, वाणिज्य झोन परिसरात 65 डेसिबल, तर औद्योगिक झोन परिसरात 75 डेसिबलपेक्षा कमी ध्वनिपातळी ठेवणे आवश्‍यक आहे. कारवाईत दोषी आढळल्यास वाहनचालकांना पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात येणार आहे.
Comments
Loading...