पवार कुटुंबियावर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाहीत : सुप्रिया सुळे

suprya sule and sharad pawar

पुणे : काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेलक्या भाषेत टीका केली होती. सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तसेच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं सेस गोळा करण्याच्या केलेल्या घोषणेनंतर चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. यांच्या बापाची पेंड आहे का? अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी फटकारलं होतं.

याच प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर असताना प्रश्न विचारला असता त्यांनी टोमणा मारत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. “पवार कुटुंबियावर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाहीत. त्यामुळे कोणीही यावं आणि आपलं मन मोकळं करावं, आम्ही दिलदार आहोत,” अशी प्रतिक्रिया देत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

यानंतर त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशावर देखील प्रतिक्रिया दिली. खडसेंच्या प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा असं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश खरंच करणार की हुलकावणी देणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

महत्वाच्या बातम्या:-