पहाटेच्या अंधारात झालेलं सरकार नाही! सर्वांसमोर झालेलं सरकार आहे – मंत्री नितीन राऊत

औरंगाबाद : उपकेंद्राच्या उद्घाटनासाठी शहरात आलेल्या उर्जा मंत्री नितीन राऊत यांना पत्रकार परिषदे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकी संदर्भात प्रश्न विचारला असता. त्याला बगल देत पहाटेच्या अंधारात तयार झालेलं हे सरकार नसून सर्वांसमोर झालेलं सरकार आहे. असे उत्तर त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर महावितरण राबवत असलेल्या योजनांबद्दल त्यांनी माहिती दिली.

वाळूज महानगर येथे महावितरण तर्फे उपकेंद्र सुरु करण्यात आले. त्याच्या उद्घाटनासाठी उर्जा मंत्री नितीन राऊत शहरात आले होते. उपकेंद्राची पाहणी करून त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जुबली पार्क स्थित महावितरणच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दल त्यांनी माहिती दिली. २५ हजार मेगा वॅट सोलार वर वीज निर्मितीचा प्रकल्प तयार करण्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतीच पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यातच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात तब्बल अर्धातास बंद दाराआड चर्चा झाली. या गुप्त भेटीतून भाजपशी जवळीक साधली जाणार असल्याचे त्यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी पहाटेच्या अंधारात झालेलं सरकार नाही! सर्वांसमोर झालेलं सरकार आहे. असा टोला लगावत प्रश्नाला बगल दिली.

महत्वाच्या बातम्या

IMP