दारूसह पंचपक्वान्नचा मनसोक्त आस्वाद! थाप मारून पसार होणाऱ्या वृद्धाचा फाईव्ह स्टार हॉटेलला गंडा

औरंंगाबाद : शहरातील फाईव्ह स्टार हॉटेलात कॉन्फरन्स असल्याची थाप मारून मुक्काम ठोकत महागडी सिगारेट, दारूसह पंचपक्वान्नचा मनसोक्त आस्वाद घेत बाहेरून येतो असे सांगून पसार होणाऱ्या जॉन ज्ञानप्रकाश विन्सेंट ऊर्फ भीमसेंट जॉन (वय ६४, रा. नटराजम किला अरसदी तुतुकड्डी तमिळनाडू) या भामट्याला वेदांतनगर पोलिसांनी गजाआड केले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जॉन ज्ञानप्रकाश विन्सेंट उर्फ भीमसेंट जॉन याला हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी गुरुवारी (दि.१०) दिले.

भीमसेंट जॉन याने हॉटेल कीज मध्ये रूम केली. विश्वास बसावा म्हणून अ;ॅग्रीकल्चर कॉन्फरन्स असल्याची थाप मारली. रूमसाठी अनामत रक्कम देखील भरली नाही. त्यानंतर त्याने रूममधे राहून महागडी २०-२५ सिगारेट मागवल्या. मात्र, महागडी व्हिस्की मागवली असता हॉटेलच्या मॅनेजरला त्याच्यावर संशय आला. जॉनने अनामत रक्कम जमा केली नव्हती.

त्यामुळे त्याच्याकडे मॅनेजरने पैसे जमा करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकच संशय आल्याने त्याचे नाव इंटरनेटवर तपासले असता त्याने विविध हॉटेलातील सामान चोरुन हॉटेलची फसवणुक केल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तात्काळ याची माहिती वेदांतनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

IMP