एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, आमदार मेघना बोर्डीकरांच्या प्रशासनाला सूचना

Meghna Sakore Bordikar

परभणी : अवकाळी पावसानंतर खरीप पेरणी परिस्थिती सोबत किती क्षेत्र बाधित आहे. त्यांना तात्काळ मदतीसाठी, पडलेली घरे, मेलेली जनावरे, पूर परिस्थितीत जमिनीची खरडणी, शेतकऱ्यांना मिळणारा विमासंदर्भात कार्यवाही जिंतूर व सेलू तालुक्यातील प्रशासन काय करत आहे? याचा प्रत्यक्ष आढावा बैठक आमदार मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या उपस्थीत घेण्यात आली. या आढावा बैठकीत जिंतूर-सेलू तालुक्यातील किती क्षेत्र बाधीत आहे? प्रत्येक बाधीत शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे असे आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी निर्देशीत केले.

जिंतूर व सेलू तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झलेल्या नुकसानीचा आढावा संदर्भाने बैठक घेण्यात आली. त्यात कृषी, पंचायत, महसूल विभागाचे तालुक्यातील अधिकारी उपस्थीत होते. अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला असून एकही शेतकरी राज्य शासनाच्या अर्थसहाय्यापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी, पोखरा योजनेची अंमलबजावणी होत असताना इच्छुक प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ झाला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकापर्यंत योजना पोहचण्यासाठी निवडलेल्या गावामध्ये जनजागृती प्रशासनाने करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.

ग्रापंचायतींना रोजगार हमी योजनेच्या करावयाच्या आराखड्यात शेत रस्ते, पांदन व अंतर्गत रस्त्यांचा लोकेशनचाही समावेश करावा त्या मुळे मागणी प्रमाणे काम करणे सोईचे होईल. महसूल विभागाने शेत रस्ते, पांदन रस्ते शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे मोकळे करून द्यावेत तसेच त्या संदर्भाने जणजागृती करावी ज्या मुळे शेत रस्ते होतील, असे निर्देशही देण्यात या वेळी देण्यात आले.  याप्रसंगी जिंतूर व सेलू येथील अधिकारी, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार जिंतुर चौधरी, गटविकास अधिकारी विष्णु मोरे आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या