घड्याळाचं मत कमळाला जाते हा आरोप बिनबुडाचा – निवडणूक आयोग

टीम महाराष्ट्र देशा – ईव्हीएमवर कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळालाच जात असल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील नवलेवाडी गावात घडला आहे. गावकऱ्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर ईव्हीएम बदलण्यात आलं. विशेष म्हणजे केंद्रावरील अधिकाऱ्यांनीही हा प्रकार होत असल्याचं मान्य केलं.

निवडणूक आयोगाने मात्र निवडणूक आयोगाकडे किंवा संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित मतदान केंद्राधिकाऱ्याकडे विहित तक्रारच केली नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार कांगावा असल्याचं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

संबंधित मतदाराने अशा प्रकारची तक्रार देणे आवश्यक असते. मात्र तक्रार न देता त्याने प्रसारमाध्यमांना माहिती दिली. प्रसार माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियात याविषयीच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रकाराची छानणी केल्यानंतर संबंधित मतदाराच्या दाव्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, या मतदानाच्या दिवशी उमेदवारांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम व्यवस्थित काम करत असल्याची शहानिशा करायला सांगण्यात आलं होतं.त्यावेल सर्व मतदान यंत्रे व्यवस्थित होती अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या