‘ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका नको’

Sambhaji Patil Nilangekar

लातूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाकरिता राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामोर आंदोलन करत लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या आंदोलनात ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निकडणुका न घेण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.

या वेळी आमदार संभाजी पाटील म्हणाले की, ‘ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे याकरिता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणतीही ठोस भूमिका किंवा त्या अनुषंगाने पावले उचलली नाहीत. सर्वोच्च न्यायालयातही याबाबत राज्य सरकारने प्रभावी बाजू मांडली नसल्याने सदर आरक्षण रद्द झाले आहे. काही महिने आधी यासंदर्भात भाजपाने केलेल्या आंदोलनावेळी ‘ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होईल’, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली होती. मात्र ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणूका जाहीर केल्याने ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. सदर निवडणुका न घेता राज्य सरकारने तात्काळ ओबीसी राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असणारी कार्यवाही करावी.’

ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय इतक्यात मार्गी लागेल अशी शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आता निवडणुका होत आहेत. मात्र, त्या जागांवर ओबीसी समाजातील उमेदवार देण्याची घोषणा सर्व प्रमुख पक्षांनी आधीच केली आहे. या सर्वात भाजप आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या