…तो पर्यंत निवडणुका नको, ओबीसी आरक्षणावर भाजपची भूमीका स्पष्ट- डॉ. भागवत कराड

Dr. Bhagwat Karad

औरंगाबाद : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व पक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आला होता. मात्र, निवडणुका पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता सरकारसमोर मोठा पेच-प्रसंग उभा राहिला आहे. यावर भाजप नेते तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी भाजपची भूमीका स्पष्ट असल्याचे सांगितले आहे.

ओबीसी आरक्षण रद्द होण्याची खरे कारण राज्य सरकारची दिरंगाई असल्याचा आरोपही डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडण्यास कमी पडले असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात भारतीय जनता पक्षाने आपली भूमीका आधीच स्पष्ट केली आहे. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत निवडणुका नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे लांबवण्याचा निर्णय सर्व पक्षांनी घेतला होता. मात्र, त्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर टीका होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या