निवडणुकीच्या आखाड्यात यापुढे उतरणार नाही : पवार

पुणे- आता यापुढे निवडणूक लढविणार नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. बालमंदीर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘आठवणीतील पुणे‘ विषयावर प्रकट मुलाखतीत त्यांनी निवडणूक लढविण्याच्या संदर्भातील आपल्या जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. पुण्याचे नेतृत्व करायला आवडेल का, या प्रश्नाावर पवारांनी आता निवडणूक नाही, असे म्हणत आगामी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली आहे.

Rohan Deshmukh

कार्यक्रमात पुणे एकेकाळी कॉफीटेबल आणि स्मरणरम्य दिनदर्शिकेचे प्रकाशन पवारांच्या हस्ते झाले. यावेळी त्रिपुराचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील उपस्थित होते. प्रकट मुलाखतीत पवारांनी पुण्यातील विविध आठवणी जागृत केल्या.

पुण्यात शिक्षण घेताना विविध महाविद्यालयीन निवडणुका पवार पॅनेलच्या माध्यमातून लढवल्या आणि जिंकल्याही. या निवडणुकीमध्ये विशेषत ग्रामीण भागातील विद्यार्थी असायचे. तेव्हापासून आजपर्यंत संघटन करण्याचे काम केले. आज राजकारणातील कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण होत असून पुण्याच्या त्या निवडणुका हाच त्याचा पाया आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार पुणे शहराविषयीच्या जुन्या आठवणींना सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान उजाळा दिला.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...