‘डीजे’बंदी हटवा, नाहीतर विसर्जन करणार नाही; पुण्यातील गणेशोत्सव मंडळांची भूमिका

टीम महाराष्ट्र देशा- गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावायला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर आज पुण्यातील काही राजकीय नेते मंडळी,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि डिजे मालकांनी या निर्णयाविरोधात निदर्शने केली. बंदी न उठविल्यास गणेशमुर्ती विसर्जन न करता जागेवरच गणपती ठेवणार अशी अडेलतट्टूपणाची भूमिका मंडळांनी घेतली आहे.

सरकारमधील विसंतगीमुळेच बाप्पांच्या विसर्जनात विघ्न : सचिन अहिर

पुण्यातील गणेश मंडळ आणि डीजे मालकांची शनिवारी पुण्यात बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शनिवारी झालेल्या बैठकीला पुण्यातील जवळपास ८० गणेश मंडळे सहभागी झाली होती.‘सरकारने न्यायालयामध्ये डीजे विषयी भूमिका योग्य प्रकारे मांडली नाही. त्यात सरकार कमी पडले. त्यामुळे न्यायालयाने या विसर्जन मिरवणुकीत देखील डीजेवर बंदी कायम ठेवली. न्यायलयाच्या या निर्णयाने आम्ही नाराज असून त्यामुळे आम्ही गणपती विसर्जन न करण्याचे ठरवले आहे. जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत गणपतीची मुर्ती मंडपातच ठेवणार असा इशारा या मंडळांनी दिला आहे.

सरकारने विशेष अधिकार वापरून डीजेला परवानगी द्यावी अशी मागणी या मंडळांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर यावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी नाहीतर आता आम्ही सरकारचेच विसर्जन करू.’, असे गणेशोत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मशिदीवरचे भोंगे बंद होत नाहीत, मग हिंदूच्या सणांना आडकाठी का?