इच्छा नसली तरी शिवसेनेला भाजपबरोबर जावेच लागेल – पृथ्वीराज चव्हाण

पुणे –  राजकीय समिकरण बदलत असून शिवसेनेची भाजपबरोबर जायची इच्छा नसली तरी त्यांना भाजपबरोबर जावेच लागेल, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ते पुण्यातील माजी खासदार संभाजी काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

माजी खासदार संभाजी काकडे यांचा सत्कार आज पृथ्वीराज चव्हाण व डी. वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी शिवसेना वेगळे लढणार या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, ‘संभाजी पाटील यांनी बारामतीत राहून आपली ताकद दाखवली आणि २ वेळा आमदार, खासदार पदी निवडून आले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा सत्कार होतो आहे. याला भाजप, सेना, काँग्रेसचे नेते आलेत यातून त्यांची मैत्री दिसून येते.