‘ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही’ ; केंद्राच्या दाव्यावर प्रियांका गांधी संतापल्या, म्हणाल्या…

priyanka gandhi

नवी दिल्ली : ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात किती रुग्णांनी प्राण गमावले? असा प्रश्न मंगळवारी राज्यसभेत सरकारला विचारण्यात आला होता. त्यावर, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -19 रूग्णांचा मृत्यू झाला का? या प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे.

यावर आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं करत आगपाखड केली आहे. ‘देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झालेला नाही, असा केंद्राचा दावा आहे’ असं सांगतानाच प्रियांका गांधी यांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

‘मृत्यू यामुळे झाले, कारण महामारीच्या वर्षात सरकारनं ऑक्सिजन निर्यात ७०० टक्क्यांपर्यंत वाढवला. सरकारनं ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणाऱ्या टँकरची व्यवस्था केली नाही. मृत्यू यामुळे झाले कारण, एम्पावर्ड ग्रुप आणि संसदीय समितीचा सल्ला कानामागे टाकून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही तयारी केली नाही. रुग्णालयांत ऑक्सिजन प्लान्ट लावण्यासाठी कोणतीही सक्रियता दाखवली नाही’ असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.

दरम्यान, सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP