अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय रे भाऊ ?

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहे.दरम्यान, अविश्वास ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

महाभियोग फेटाळला तरी लढा सुरू राहणार: सुप्रिया सुळे

अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय?

  • सरकार ज्या सभागृहाला जबाबदार असतं त्या सभागृहाचा जेव्हा सरकारवर विश्वास उरत नाही तेव्हा हा प्रस्ताव सादर केला जातो.
  • हा प्रस्ताव विरोधातला कुठलाही पक्ष कुठल्याही अधिवेशनात आणू शकतो.
  • लोकसभेतल्या किमान 50 किंवा 1/10 सदस्यांचा त्याला पाठिंबा आवश्यक असतो.
  • प्रस्ताव सादर करताना या सदस्यांना लोकसभा अध्यक्षांसमोर उभं राहून तसं सांगावं लागतं. किमान 50 सदस्यांचा पाठिंबा स्पष्ट झाल्यास अध्यक्ष प्रस्ताव स्वीकारतात.
  • या प्रस्तावाकडे विरोधी पक्षाच्या हातातलं एक हत्यार म्हणूनही पाहिलं जातं. सरकारला अडचणीत आणण्यासाठी त्याचा वापर विरोधक करतात.
  • विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ असेल तर किंवा सत्ताधारी पक्षात किंवा आघाडीत फूट पडली तर मात्र हा प्रस्ताव सरकारसाठी कठीण असतो.
You might also like
Comments
Loading...