fbpx

महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ; राष्ट्रवादीच्या इतर महिला नेत्याप्रमाणे सुप्रिया सुळेंचेही मौन

supriya sule 1

टीम महाराष्ट्र देशा- सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची एक वादग्रस्त ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिप मध्ये त्यांनी अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या आहेत. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने साळुंखे पाटलांना फोन करुन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केव्हा करणार याबाबत विचारणा केली असता, त्यांनी पक्षातील महिला पदाधिकारी आणि सोलापुरातील ज्येष्ठ नेत्यांबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केला आहे.

मात्र एका बाजूला ही क्लिप व्हायरल होत असताना राष्ट्रवादी मात्र या मुजोर नेत्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे. महिलांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या राष्ट्रवादीच्या  इतर महिला नेत्यांप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणावर सोयीस्करपणे मौन बाळगले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महिलांचा अवमान आमदार राम कदम यांनी देखील केला होता त्यावेळी कदम यांच्या बेताल वक्तव्याचा सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, अशा शब्दात  सुळेंनी राम कदम यांना दम भरला होता.

आम्ही हा विषय पक्षश्रेष्टींकडे आणि शिस्तपालन समितीकडे सोपविणार आहोत .या क्लीपची सत्यता तपासली जाईल आणि मग त्यामध्ये जर ते दोषी आढळले तर पुढचा विचार केला जाईल असं बुळबुळीत स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिलं आहे. माझं आणि दीपक आबांचं अद्याप काहीही बोलणं झालं नाही तसेच पक्षाकडून कोणतंही स्पष्टीकरण मागवण्यात आलेलं नाही असं देखील ते म्हणाले .

नेमकं काय म्हटलं आहे या क्लिप मध्ये ?

“शरद पवार आहेत तो पर्यत माझं कोणी सुद्धा वाकडं करू शकत नाहीत. त्या ‘बाई’ला ****आला असेल तर दे म्हणावं राजीनामा, **** कार्यकर्त्यांना मी भीक घालत नाही. कोणत्या **** राजीनामा द्यायचा आहे त्यांनी खुशाल द्यावा. मोहिते पाटलांचे चमचे, **** लोकांनी आपल्याला पक्ष निष्ठा शिकवू नये”… अशा प्रकारचे बेताल आणि शिवराळ संभाषण या ऑडियो क्लिपमध्ये आहे. त्यामुळे पक्षाच्या महिला व इतर पदाधिकाऱ्याबाबत अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या साळुंखे पाटलावर पक्षांचे ज्येष्ठ नेते काय कारवाई करतात, की त्यांना पाठीशी घालतात याकडे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

फेसबुकवरून बदनामी, सुप्रिया सुळेंनी केली पोलिसात तक्रार