राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत

टीम महाराष्ट्र देशा : राजकीय पक्ष नेहमी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी व्यापाऱ्यांना बंद मध्ये सहभागी करवून घेतात. मात्र आता व्यापारी या सर्व कारणांमुळे वैतागलेल्या व्यापाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी पाळणार नाहीत, असा निर्णय महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने घेतला आहे.

राज्यात यापुढे कोणत्याही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा ठराव, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने केला आहे. सतत होणाऱ्या बंद आणि आंदोलनामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत व्यापारी संघटनेने हा ठराव मांडला आहे. त्यानुसार आगामी काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला व्यापारी पाठिंबा देणार नसल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली आहे.

Loading...

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पुण्याचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनीही या ठरावाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, राज्यभरात व्यापाऱ्यांनी ठराव मोहिमेचा कार्यक्रम हाती घेतला आहे.मागील काही वर्षांपासून बंद आणि आंदोलनाचे प्रकार देशभरात वाढले आहेत.

बंद आणि आंदोलनाचा सर्वात जास्त फटका बसतो तो सामान्य व्यापाऱ्यांना. बंद काळात दुकाने बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. शिवाय आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडला तरी दुकाने संकटात सापडतात. या सततच्या गोष्टींना व्यापारी वर्ग वैतागल्याने त्यांनी हा ठराव मांडल्याची माहिती दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात