रेपो रेट जैसे थे

महागाई आणखी वाढण्याची शक्यता.

जीएसटी लागू झाल्यानंतर महागाई कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र आरबीआयने हा अंदाज फेटाळला आहे. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातली वाढ, खरीप उत्पादन घटण्याची शक्यता आणि शेतकरी कर्जमाफीमुळे महागाई वाढण्याचा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे.

ग्राहकांकडून कमी झालेली मागणी, गुंतवणुकीतील मंदावलेला वेग आणि निर्यात कमी झाल्याने एकूण मागणी घटली आहे. जीएसटीमुळे पुन्हा एकदा निर्मिती क्षेत्रावर परिणाम झाला. शेती क्षेत्राची परिस्थिती स्थिर आहे. तर सेवा क्षेत्रामध्ये किंचित सुधारणा झाली आहे.

रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील चौथे द्विमासिक पतधोरण बुधवारी जाहीर केले असून रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले आहेत.

गेल्या द्विमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली होती. मात्र यंदाच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कायम ठेवले जाण्याची चर्चा आधीपासूनच होती. मंगळवारपासून पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात झाली होती. बुधवारी ही बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. अपेक्षेनुसार पतधोरण समितीने रेपो दर कायम ठेवले आहे. यानुसार रेपो दर ६ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्क्यांवर कायम आहे. विकासदर ६.७

You might also like
Comments
Loading...