…म्हणून राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाहीत – रामदास आठवले

डेहराडून – २१०९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यास मी पंतप्रधान होऊ शकतो असं राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारसभेत म्हंटल होतं. यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्ता स्थापण्यात यशस्वी ठरल्याने पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करण्याच्या काँग्रेसच्या आशा पल्ल्ववीत झाल्या आहेत.

यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात अजूनही मोदी लाट सुरू असून पुढील १० ते १५ वर्षे ती कायम राहील. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान बनण्याचा प्रश्नच नाही, असे मत व्यक्त केले आहे.

डेहराडून येथे माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले की, आगामी सर्वच निवडणुकांत मोदी लाट चालेल. कारण ते समाजातील सर्व वर्गांना बरोबर घेऊन जाण्यात विश्वास ठेवतात. त्यामुळे जनता कायमच त्यांच्यासोबत राहील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

You might also like
Comments
Loading...