मायावतींचा ‘तो’ सरकारी बंगला सोडण्यास नकार

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांना ७ मे रोजी सरकारी निवासस्थाने सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव, कल्याण सिंह, राजनाथ सिंह, अखिलेश यादव यांनी आपले सरकारी बंगले खाली करण्यास सहमती दर्शवली आहे.

मात्र मायावती यांनी त्यांचे निवासस्थान १३ ए मॉल अव्हेन्यू हा बंगला पक्ष संस्थापक काशीराम यांचे स्मारक असल्याचा दावा करत तो आपण सोडणार नसल्याचं म्हंटलं आहे. दरम्यान मालमत्ता विभागाने त्यांचा दावा फेटाळला असून, १३ ए मॉल अव्हेन्यू निवासस्थान मायावती यांना मुख्यमंत्री म्हणून देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ते रिकामे करावे अशी नोटीस आता त्यांना पाठवण्यात आली आहे.