राज्यात फटाके बंदी नाहीच; रामदास कदम

टीम महाराष्ट्र देशा: आम्हाला हिंदूंच्या सणांची काळजी आहे. त्यामुळे कोणीही चिंता करू नये तसेच राज्यात फटाके बंदी केली जाणार नसल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रातही फटाके बंदी विचाराधीन असल्याच आपण बोललो नाही असही ते म्हणाले आहेत.

काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रामदास कदम यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली होती, यावेळी त्यांनी महाराष्ट्रात प्रदूषणमुक्त दिवाळी करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले होते. दरम्यान रामदास कदम यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचेच खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाना साधला होता. आज या टीकेला उत्तर देताना कदम म्हणाले कि, ‘दिल्लीत फटाकेबंदी झाली नाहीये तर व्यापारी भागात फटाके विक्री करण्यास कोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे केवळ प्रशिद्धीसाठी न बोलता संपूर्ण माहिती घेयला हवी होती’.