चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील ‘त्या’ अधिकाऱ्याला निलंबित

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटचे जवान आले होते. सकाळपासून हे जवान महाराष्ट्र सदनात बँडच्या माध्यमातून कार्यक्रमात शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचं काम करत होते. मात्र दुपारी जेवणाच्या वेळी हे जवान कॅन्टीनमध्ये गेले असताना सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना जेवणाच्या ताटावरुन बाहेर हाकलल्याचा धक्कादायक आणि शरमेने मन खाली घालायला लावेल असा प्रकार घडला.

पहाटे ६ वाजल्यापासून हे जवान महाराष्ट्र सदनात उपस्थित होते. गोरखा रेजिमेंटचे जवान कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत, पण पहिल्यांदाच शिवजयंतीच्या निमित्ताने हे जवान महाराष्ट्र सदनात आले होते. या जवानांना कॅन्टीनमध्ये बोलवण्यात आलं होतं. त्यांना जेवणासाठी ताटं वाढून ठेवलं होतं. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र प्रशासनाचे अधिकारी विजय कायरकर यांनी तुम्हाला इथं जेवता येणार नाही, तुमची व्यवस्था अन्य ठिकाणी केली आहे असं सांगत त्यांना कॅन्टीनमधून बाहेर काढलं.

Loading...

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बॅंड पथकातील जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांच्या मुळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळविण्यात आले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते.यावरून आदित्य यांच्या कामगिरीचे वर्णन हे चुकीला माफी नाही अशा पद्धतीचे आहे असेच म्हणता येईल.

जवानांसोबत झालेल्या या दुर्व्यवहाराच्या प्रकरणाची माहिती मिळताच राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेऊन सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा करुन माहिती घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी संबंधित सहायक निवासी आयुक्तावर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले.

त्यानुसार महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांनी आदेश काढून कायरकर यांना सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) पदावरुन कार्यमुक्त केले आहे. तसेच जवानांशी केलेल्या दुर्व्यवहारप्रकरणी कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांची मुळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळविण्यात आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका