fbpx

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात कोणताही पर्याय नाही : आदित्य ठाकरे

aaditya thakray

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसेनेने प्रचाराचा चांगलाच धडाका लावला आहे तर युवानेता आदित्य ठाकरे हे देखील प्रचारात चांगलेच सक्रीय झाले आहेत. नाशिक येथे झालेल्या सभे मध्ये आदित्य ठाकरे यांनी भाजप बरोबर युती का केली याच स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सध्या तरी दुसरा कोणताही पर्याय नाही. हे विचारात घेऊन युती केली आहे असे आदित्य म्हणाले आहेत.महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नाशिक शहर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हा खुलासा केला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसरा पर्याय नाही. त्यामुळे हा विचार करूनच आम्ही भाजप बरोबर युती केली. शिवसेना – भाजप साडेचार वर्ष आपापसात भांडले हे खरे आहे. परंतु युती करणे आवश्यक होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेना-भाजपा युतीने राज्यात आणि केंद्रात सर्वांगीण विकासाची कामे केली असून वचननाम्यातील सर्व कामे पूर्ण केली आहेत. तसेच राज्यभर महायुती भक्कम असून लोकसभेच्या संपूर्ण 48 जागा महायुतीला मिळाल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका, असे ते म्हणाले.

देशात आज पाकिस्तानला धडा शिकविणारे, तेथे घुसून ठोकून काढणारे, 56 इंचाची छाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. त्यामुळे देश रक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे देखील आवाहन केले.