‘कॉंग्रेस सोबत युती करणार नाही, एमआयएमसोबत युतीसाठी शेवटपर्यंत वाट पाहाणार’

टीम महाराष्ट्र देशा : अनेक दिवसांपासून कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरु होती, मात्र आज त्यावर पूर्णविराम लागला. आगामी विधानसभा निवडणुकीत आमची कॉंग्रेससोबत जाण्याची इच्छा नाही. असं सांगत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेससोबत युती करणार नसल्याची स्पष्ट केलं.

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी विविध मुद्यांवर पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कॉंगेसच्या वागणुकीत अजून कोणताही फरक झालेला नाही. कॉंग्रेस आघाडीसाठी अजूनही लोकसभा निवडनुकीप्रमाणे वागत आहे. आम्ही कॉंग्रेसला प्रस्ताव दिला आहे मात्र ते कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमचा एमआयएमसोबत युतीचा पर्यंत राहील. तर आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून गणेश विसर्जनानंतर आमची यादी जाहीर करू असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.