देशाला ना ‘मोदी’ पाहिजे ना ‘राहुल’- अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: जनलोकपाल आंदोलनाने संपूर्ण देशात एक नवी उर्जा निर्माण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे लोकपाल कायद्यासाठी २३ मार्चला पुन्हा मैदानात उतरत आहेत. “देशाला स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाले तरी देशात लोकशाही नाही. या देशाला ना नरेंद्र मोदी हवेत ना राहुल गांधी कारण हे दोघेही फक्त व्यावसायिक लोकांच्या आदेशाने काम करतात. या देशाला शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार हवे.” असा टोला अण्णांनी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींना लावला आहे.
अण्णा हजारे २३ मार्च पासून दिल्लीत जनलोकपाल कायद्यासाठी पुन्हा आनंदोलनात उतरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक पत्र लिहून सुद्धा त्यांच्याकडून कोणातच उत्तर न आल्याने अण्णा पुन्हा आंदोलनासाठी उतरत आहेत .Loading…


Loading…

Loading...