सरकारच्या अधोगतीची वेळ आली आहे- अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांना धोका देणारा अर्थसंकल्प असल्याचा आरोप जेष्ठ समाजसेवकअण्णा हजारे यांनी केला आहे. लाखो शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा होती. मात्र या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीच तरतूद नाही, असही अण्णा म्हणाले आहेत.

कष्टकरी शेतकऱ्यांना पेन्शन जाहीर करणं अपेक्षित असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे. मात्र सरकार शेतकरी विरोधी आणि उद्योगपती धार्जिणं असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याचं अण्णा म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हातात चावी असून येत्या काळात शेतकरीच सरकारला शिकवतील. शेतमालाचे दर, स्वामीनाथन आयोगावर काहीच केलं नाही. या अर्थसंकल्पात भुरळ घालणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या तरतुदी आहेत. या विरोधात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन 23 मार्चला दिल्लीत आंदोलन करुन निषेध करण्याचा ईशारा अण्णांनी दिला. या माध्यमातून सरकारच्या अधोगतीची वेळ आल्याचंही अण्णांनी म्हटलं.

सरकारच्या अर्थसंकल्पावर अनेक मत मतांतरे मांडली जात आहेत. सत्ताधारी समर्थन करत आहेत, तर विरोधक टीका करत आहेत. मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अर्थसंकल्पावरुन विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे.

You might also like
Comments
Loading...