वाढदिवसानिमित्त निया, टोनी कक्कडचा ‘वादा’ गाण्याने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष

nia

मुंबई : जमाई राजा या मालिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री निया शर्मा. ती अभिनय, डान्स याशिवाय बोल्ड लुकमुळे सतत चर्चेत असते. आज निया शर्माचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात गायक टोनी कक्कड आणि निया ‘वादा’ या रोमँटिक साँगवर परफॉर्म करतांना दिसत आहेत.

नियाचा  दिल्लीमध्ये जन्म झाला. तिचं शिक्षणही दिल्लीमध्ये झालं. मीडिया अभ्यासक्रमाची पदवी तिनं घेतली. तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल  सांगायच तर ‘एक हजारो में मेरी बहना है, ‘इश्क में मरजावां, जमाई राजा, नागिन ४ सारख्या मालिकांमध्ये अभिनय केले आहे. तसेच रवि दुबे यांच्या ‘जमाई २.०’ या वेब सिरिजमध्ये ही काम केलं आहे. नुकतेच ही वेब सिरिज रिलिज ही झाले आहे. दरम्यान टोनी कक्कडचा ‘काटा लगा’ गाणं नुकताच प्रदर्शित झाले आहे.  सध्या आशियातील सर्वात हॉट वुमन म्हणून नियाची ओळख ही निर्माण झाली आहे.

निया ‘खतरो के खिलाडी’ कार्यक्रमाची विजेती देखील होती. सोशल मीडियावर आपल्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. खास वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी सुंदर भेट आहे. या व्हिडिओवर ‘या सुंदर गाण्याला पुन्हा एकदा अनुभतोय..’ असे कॅप्शन असून हजारोंनी लाईक, कमेंटस् येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :