टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक

पिंपरी चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे माध्यमांच्या रडारवर असल्याचे चित्र आहे.अनेक स्थरातुन इंदुरीकर महाजरांवर टीका सुरू असताना त्यांच्या समर्थनार्थ काही लोक पुढे येत आहेत. पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे इंदुरीकर महाराजांची बैलगाडीतुन मिरवणूक काढत पाठिंबा दर्शवला आहे.

यावेळी वारकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणाव हजर होते.पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजयंती निमित्त ह.भ.प महाराज इंदुरीकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करत, उपस्थित नागरिक, वारकरी यांनी बैलगाडी मधून इंदुरीकर महाराज यांची मिरवूनक काढत कीर्तनस्थळी नेले. शेकडो नागरिकांची गर्दी पाहून महाराजही सर्वांना नमस्कार करत होते.

Loading...

दरम्यान, काल निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं बीड जिल्ह्यातील आष्टीतील कड्याजवळच्या कुंभारवाडीमध्ये रविवारी दुपारी किर्तन होते. या किर्तनाला येताना इंदुरीकर महाराजांचे जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे ‘आय सपोर्ट इंदुरीकर’ अशा नावाचे फलक घेतलेले लोक या कीर्तनामध्ये सहभागी झाले होते. महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशाही आशयाचे फलक लोकांच्या हातात होते.

निवृती महाराज इंदुरीकर यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून त्यांना बदनाम करुन महारांजाचे समाज प्रबोधनाचे कार्य हाणुन पाडण्याचा कुटील डाव काही कटकारस्थान करणाऱ्या लोकांनी रचला आहे.त्यामुळे समाज प्रबोधनकार निवृती महारज देशमुख इंदुरीकर यांना करमाळा तालुक्यातील शिवप्रताप युवा प्रतिष्ठान व शिवसंस्कार प्रतिष्ठान या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जाहिर पाठींबा दिला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....