‘हेराफेरी’मधील व्हिडीओ ट्वीट करत नितेश राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेनेमुळे हुकलेली आमदारकीची संधी राणे पिता-पुत्रांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केला आहे.

शिवसेनेकडून सत्तेतून बाहेर पडण्याच्या वारंवार धमक्या दिल्या जातात त्या मुद्द्याला पकडून हेराफेरी मधील परेश रावल ,सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार या पात्रांना मुखवटे लावून हा व्हिडीओ तयार केला आहे. अक्षय कुमारच्या भूमिकेत उद्धव ठाकरे,सुनील शेट्टीच्या भूमिकेत संजय राऊत तर परेश रावलच्या भूमिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवले आहेत.अक्षय कुमार परेश रावल यांना घर सोडून जाण्याची धमकी देत असतो मात्र शेवटपर्यंत घर सोडून जात नाही हा सीन या क्लिप मध्ये दाखवण्यात आला आहे.नितेश राणे यांच्या या ट्वीट ला शिवसेनेकडून कशा पद्धतीने उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.