नितीशकुमार आणि सुशील मोदी एम्समध्ये

टीम महाराष्ट्र देशा– बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी एम्स रूग्णालयात आले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांची भेट घेण्यासाठी सकाळपासूनच भाजपाच्या नेत्यांनी एम्स रूग्णालय गाठले आता नितीशकुमार आणि सुशील मोदी या दोघांनीही एम्स रूग्णालयात आले आहेत. त्यांच्यासोबत बिहारचे मंत्री नंदकिशोरही आहेत.

गुरुवारी सकाळपासून अमित शाह, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी यांच्यासह अरविंद केजरीवाल व अन्य विरोधी पक्षातील नेतेही वाजपेयींची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये पोहोचले.

वाजपेयी यांना सध्या कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले असून त्यांना स्मृतीभ्रशांचा विकार आहे. त्याचबरोबर ते किडनी विकाराने सुद्धा त्रस्त आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.