fbpx

नितीश कुमारांचा धाडसी निर्णय, आई वडिलांची सेवा केली नाही तर…

टीम महाराष्ट्र देशा: वृद्ध आई – वडिलांना पोटच्या मुलांकडूनच वाऱ्यावर सोडले जाण्याचे प्रकार समाजात वाढताना दिसत आहेत, आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट केले त्याच मुलांकडून वृद्धापकाळात जन्मदात्यांची प्रतारणा केली जाते, त्यामुळे अशा मुलांना कडक शासन करण्याचा धाडसी निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे.

आई – वडिलांची सेवा न करणाऱ्या मुलांना जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. आई – वडिलांच्या तक्रारीनंतर मुलाविरोधात गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे.