लालूंना जेलमध्ये पाठवण्यामागे नितीश कुमार यांचा हात : तेजस्वी यादव

lalu prasad yadav

टीम महाराष्ट्र देशा : कोट्यावधींच्या चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यामुळेच त्यांना भ्रष्टाचाराचा महामेरू असं देखील म्हटलं जाते. मात्र आता लालूप्रसाद यादव यांना जेलमध्ये पाठवण्यामागे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपची मिलीभगत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी हे आरोप केले आहे.

लालू प्रसाद यादव यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते जेलमधून बाहेर येऊ शकत नाहीत. न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. मात्र बाहेर येण्यासाठी ते सारखे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नास कधीच यश येणार नाही. असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नालंदा येथे केले होते. यावरूनच तेजस्वी यादव यांनी नितेश कुमार आणि भाजप आपल्या वडीलांना जेलमध्ये पाठवण्यासाठी जवाबदार असल्याचे आरोप केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावणारे न्यायाधिश सवर्ण समाजातील होते आणि यामुळेच हा निर्णय लालूंच्या विरोधात गेल्याचे धक्कादायक आणि संतापजनक वक्तव्य आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी केले होते. तिवारी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.