देशात सात टप्यात निवडणुका कशासाठी ? नितीश कुमारांचा निवडणुका आयोगाला सवाल

nitish kumar

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यांतील ५९ जागांसाठी हे मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लढत असलेल्या वाराणसी लोकसभेचा देखील समावेश आहे. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यंदाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाने सात टप्प्यात मतदान घेवून निवडणूक लांबविण्याची आवश्यकता नव्हती असं मतं मांडले आहे.

शेवटच्या टप्यातील मतदानानंतर नितीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नितीश कुमार म्हणाले की, एवढ्या उन्हाळ्याच्या दिवशात मतदान व्हायला नको होत्या, फेब्रुवारी-मार्च अथवा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेतल्या पाहिजेत. कारण इतक्या तापमानात मतदान करण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच यंदाच्या निवडणुकीचे टप्पे खूपच लांबले गेले आहेत. एका टप्प्यात निवडणुका होणं आदर्श आहे, पण आपला देश मोठा असल्याने दोन-तीन टप्प्यात निवडणुका व्हायला हव्यात हे मान्य आहे. मात्र यंदाच्या लांबलेल्या निवडणूक प्रक्रियेमुळे मतदार, नेते, पक्ष आणि मिडीया सर्वांना त्रास सहन करावा लागतो. असे मत नितीश कुमार यांनी मांडले.

Loading...

दरम्यान सतराव्या लोकसभेसाठी एकूण सात टप्यामध्ये मतदान घेण्यात आले आहे, आज अखेरच्या टप्यात पंतप्रधान मोदींसह भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे. नरेंद्र मोदी, पंजाबच्या गुरूदासपूर मतदारसंघामधून भाजपने अभिनेते सनी देओल, चंदीगडमधून विद्यमान खासदार किरण खेर, केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत