दारूबंदी पाठोपाठ नितीशकुमारचा आणखी एक धडाकेबाज निर्णय.

बालविवाह रोखण्यासाठी एक नवीन अभियान .

टीम महाराष्ट्र देशा  –  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे नेहमीच चर्चेत असतात. सत्ते आल्यानंतर दारूबंदी हा नितीश कुमारांचा सर्वाधिक चर्चा झालेला निर्णय होता.नितीश कुमारांनी आता आणखी एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे नितीशकुमार पुन्हा चर्चेत आले आहेत.तो निर्णय असा आहे.

बिहार मध्ये मोठ्याप्रमाणात बाल विवाह केले जातात. या बरोबरच हुंडा यासारख्या असंख्य जुन्या प्रथामुळे अनेक मुली बळी पडत आहे. बालविवाह रोखण्यासाठी नितेशकुमार यांनी एक अभियान सुरु केले आहे.या अभियाना अतंर्गत यापुढे लग्न लावणाऱ्या पंडितानासाठी एक नियम करण्यात आला आहे. लग्न होत असलेली मुलीचे अठरा वर्ष पूर्ण आहेत हे पंडिताने लिहून देणे अनिवार्य असेल. याकरता राज्यभरातील सर्व पंडितांची नोंदणी करण्यात येत आहे. याबरोबरच त्या मुलीचे आधार कार्ड देखील त्या फॉर्म सोबत जोडणे गरजेचे असेल.

पोलिसांना देखील या अभियाना अतंर्गत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी देखील या अभियानात सहभागी व्हावे असे आव्हान राज्य सरकारमार्फत करण्यात आले आहे नितीशकुमारच्या या निर्णयामुळे बालविवाह मोठ्याप्रमाणात रोखले जातील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे

You might also like
Comments
Loading...